mani nahi bhav mhane deva mala pav lyrics
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव,त्याल अग्नीचं भेव ।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी – ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड् यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥४॥
mani nahi bhav mhane deva mala pav lyrics